गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनाGopinath munde vima scheme शेतकरी अपघात विमा योजना२०२३!

 शेतकरी मित्रांनो ,आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या परिस्थितीत किती विमा सरकारकडून मिळणार आहे, तसेच कोणत्या कारणास्तव विमा दिला जाणार आहे. तसेच कधी विम्याचा लाभ घेता येणार नाही. विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ,पात्रता , मिळणारी रक्कम आणि लागू असणाऱ्या अटी , शासन निर्णय कोणत्या कारणास्तव लाभ मिळणार, अर्ज कुठे करायचा , कोणत्या विमा कंपनी द्वारे विमा मिळेल यांची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत


Gopinath munde apghat vima yojana 

  • शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची करणे वेगवेगळी असू शकतात . 
  • जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती , पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो.

  • त्यामुळे या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता , महाराष्ट्र सरकारने हि योजना २००५-०६ सुरु केली तेव्हा त्याचे नाव ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ असे होते ते बदलून ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ असे करण्यात आले. 

  • २००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली       

आणखी वाचा: 👉 पीक विमा ubdate!नांदेड जिल्ह्यात १६० कोटी विमा परताव्याची प्रतिक्षा 

उर्वरित ७५%पीक विमा वाटप सुरू!वाचा pik vima अपडेट!

  मागेल त्याला विहीर महाराष्ट्र शासनाची योजना

कोणत्या अपघात बाबीवर किती विमा वितरित केला जाईल?

  • जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.
  • जर शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला २ लाख एवढा विमा देण्यात येईल.
  • जर शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेकऱ्याच्या कुटुंबाला २लाख एवढी रक्कम विम्याच्या स्वरूपात दिली जाईल.
  • जर अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर त्याला १ लाख विमा दिला जाईल.

    शेतकऱ्याला विमा लाभ केंव्हा देय असेल?

    • योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीसाठी प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी हि योजना लागू असेल. 
    • या कालावधीत शेतकऱ्याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरी ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असेल.

    योजनेचा लाभ घेण्यासाठी घेण्यासाठी पात्रता कोणती?

    • महाराष्ट्र तील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई,वडिल, लाभार्थी चे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.

    Pdf dawnload करा:https://drive.google.com/file/d/1BtrEiZRe7Sff0IenflLWpew2q0VJqs3A/view?usp=drivesdk

    गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा शासन निर्णय –

    • विमा कंपनीस व विमा सल्लागार कंपनीस १२ महिने कालावधीकरिता होणारी एकूण विमा हप्ता आणि विमा ब्रोकरेज रक्कम रु.९८,०५,७५,८३४ ( अठ्ठयान्नव कोटी पाच लाख पंच्याहत्तर हजार आठशे चौतीस) मंजूर करून वितरित करण्याला मान्यता दिली आहे.

    • विमा कंपनीमार्फत प्रति शेतकरी प्रति वर्ष रु.३२.२३ इतका विमा हप्ता दराने(विना ब्राकरेज) व जायकाइन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. नागपूर या विमा सल्लागार कंपनीमार्फत ०.०८ टक्के इतका विमा ब्रोकरेजदराने राबववण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणी शासन निर्णय २७ एप्रिल २०२१

    विमा कंपनीस व विमा सल्लागार कंपनीस १२ महिने कालावधीकरिता होणारी एकूण विमा हप्ता आणि विमा ब्रोकरेज रक्कम रु.९८,०५,७५,८३४ ( अठ्ठयान्नव कोटी पाच लाख पंच्याहत्तर हजार आठशे चौतीस) मंजूर करून वितरित करण्याला मान्यता दिली आहे.

    विमा कंपनीमार्फत प्रति शेतकरी प्रति वर्ष रु.३२.२३ इतका विमा हप्ता दराने(विना ब्राकरेज) व जायका
    इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. नागपूर या विमा सल्लागार कंपनीमार्फत ०.०८ टक्के इतका विमा ब्रोकरेज
    दराने राबववण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

    विमा हप्ता किती भरायचा?

    आणखी वाचा👇

     उर्वरित ७५% पीक विमा वाटप सुरू पाहा कोणत्या जिल्ह्याला किती तालुके पात्र आहेत! https://spmunde.blogspot.com/2023/04/pik-vima.html

    शेतकऱ्याला विमा हप्ता भरण्याची गरज नाही. कारण सरकार शेतकऱ्याच्या वतीने विमा कंपनीस प्रति शेतकरी रु. ३२.२३ रुपये विमा कंपनीस भरते



    अर्ज करण्यास लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ?


    • ७/१२ आणि ८-अ प्रमाणपत्र यांची मूळ प्रत
    • मृत्यूचे प्रमाणपत्र
    • अपघात कोणत्या कारणामुळे झाला याचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल.
    • वयाचा दाखला ( उपलब्ध नसल्यास शपथपत्र)
    • घटना स्थळ पंचनामा

    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?

    या योजनेसाठी अर्ज करावयाचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा. शेतकऱ्याला दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात येईल.

    1 Comments

    1. खुप छान माहिती आहे 👌👌

      ReplyDelete
    Previous Post Next Post