पीक विमा ubdate!नांदेड जिल्ह्यात १६० कोटी विमा परताव्याची प्रतीक्षा.

नांदेड जिल्हा पीक विमा ubadate!नांदेड 

  • जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२२ मध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शूरन्स कंपनीकडे दहा लाख ५७ हजार ५०८ अर्जदार शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार ४२२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते.



  • यात सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, उडीद व मूग या पिकांसाठी विमा काढण्यात आला होता. दरम्यान यंदा अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे नुकसानीबाबत विमा कंपनीकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.

  • यानुसार जिल्ह्यात चार लाख ७३ हजार ५७० विमाधारकांनी माहिती कळविली होती. यात कंपनीकडून पंचनामा झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना स्थानिक नेसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ९७ कोटी ९७ लाख तर काढणीपश्‍चात नुकसान या घटकांतर्गत तीन कोटी २८ लाख असा एकूण १०१ कोटी २५ लाखांचा परतावा मंजूर केला आहे.


  • यासोबतच जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरिपातील सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन ॲडव्हर्सिटी) घटकांतर्गत नुकसानीच्या २५ टक्के भरपाई मिळावी यासाठी अधिसूचना जाहीर केली होती.


  • ही अधिसूचना विमा कंपनीने मंजूर करून सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी या पिकांचा विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना ३६७ कोटींची रक्कम मंजूर केली. यातील ८५ टक्क्यांसार ३१० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर शिल्लक १५ टक्क्यांनुसार ५७ कोटी अद्याप मिळाले नाहीत.

केंद्र सरकारकडून हफ्ता विमा कंपनीकडे जमा !


  • केंद्र तसेच राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार विमा हप्ता कंपनीकडे नुकताच जमा झाला आहे.


  • याबाबत कंपनीकडून २५ ते ३० मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर परतावा जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु अद्याप तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नसल्याची माहिती समोर आली


आणखी वाचा:खरीप पीक विमा मंजूर २०२२! 842कोटी रू मंजूर.


1 Comments

  1. धन्यवाद! माहिती दिल्याबदद्ल 🙏

    ReplyDelete
Previous Post Next Post